भाजप वर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Foto

दिल्ली- रामलीला मैदानावर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की पुढचे पाच महिने फक्त निवडणुकीचे आहेत. आपण जो प्रत्येक लेख वाचू, न्यूज बघू त्यावेळी कसे जिंकायचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेवर पुन्हा कसे आणायचे ही एकच गोष्ट लक्षात असली पाहिजे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही काम चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही अजून भरपूर काही करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे त्याची कल्पना आहे. आम्ही अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वामीनाथन आयोगाची शिफारस मंजूर केली. शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट समर्थन मुल्य देत आहोत. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची आधी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी शॉर्टकटचे मार्ग अवलंबले. आधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे मतपेटी म्हणून पाहिले. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण  १० टक्के आरक्षण नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे. सरकारी तिजोरीत जमा होणारा प्रत्येक पैसा राष्ट्र निर्माणासाठी वापरला जात आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते हे भाजपाने सिद्ध केले आहे. दलालाना सुद्धा बाहेर काढता येते हे भाजपाने दाखवून दिले. सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. आता देश नव्या विश्वासाने भाजपाकडे पाहत आहे. आपल्या आधीच्या सरकारने देशाला अंधारात ढकलले. २००४ ते २०१४ ही दहावर्ष देशाने भ्रष्टाचार, घोटाळयामध्ये गेली. सरदार